• सोनेवाडी (बु) गावात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्त्री व पुरुषांसाठी स्वतंत्र सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम केले गेले आहे. यामुळे गावातील स्वच्छता आणि आरोग्याचे वातावरण सुधारले आहे.
  • ग्रामपंचायतीकडे स्वतंत्र भव्य इमारत आहे, जिथे सर्व प्रशासनिक कामे केली जातात. ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डसाठी अद्यावत फर्निचर उपलब्ध असून, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांचे कार्यालय देखील इमारतीत आहे.
  • ग्रामपंचायत संगणीकृत प्रणाली वापरत असून नागरिकांना ऑनलाइन दाखले सहज उपलब्ध करून दिले जातात. या उपाययोजनांमुळे गावातील प्रशासन अधिक पारदर्शक व सुलभ झाले आहे.